Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*लातूर जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन*



 *लातूर जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच भारतीय जनता पार्टीला मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार!*


*आपल्या शिरूर अनंतपाळ येथे भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे. तेथील कार्यकर्त्यांची मेहनत आणि समर्पित कार्य यामुळे येथे पक्षाला बहुमत प्राप्त झाले आहे. येथे विकास साधण्यासाठी भाजपा कटीबद्ध आहे.*


*इतर तीन ठिकाणी नागरिकांनी जो कौल दिला आहे त्याचा आम्ही सन्मान करतो, या भागात भारतीय जनता पार्टीच्या कार्याला मतदारांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही कुठे कमी पडलो यावर अंतर्मुख होऊन विचार करत आहोत. पुढील काळात या भागातील विकास कार्य करण्यासाठी आमचे निवडून आलेले सदस्य प्रयत्नरत राहतील तसेच सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे कार्य आम्ही समर्थपणे पार पाडू.*


*निवडणुकीत प्राप्त झालेला विजय ही जबाबदारी असते, तर पराजय म्हणजे अंतर्मुख होण्यासाठीची संधी.*


विजयाने हुरळून जायचे नसते आणि पराजयाने खचून जायचे नसते हेच आपल्याला भाजपा शिकवते. तेंव्हा आपण एकजुटीने मिळालेल्या जबाबदारी साठी कामाला लागू. आपल्याला मिळालेली जबाबदारी हीच राष्ट्र सेवेचे साधन आहे.

- माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर 

Post a Comment

0 Comments