*हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी*
निलंगा :-( प्रतिनिधी)
हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना निलंगा व महाविकास आघाडीच्या वतीने साजरी करण्यात आली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करून तमाम हिंदू बांधवांना एकत्र करून शिवसेनेच्या माध्यमातून समाजसेवा केली. त्या आदर्श तत्वावर सर्व शिवसैनिक वाटचाल करत आहेत. अशा या व्यक्तिमत्त्वाची जयंती साजरी करण्यासाठी निलंगा तालुक्यातील तमाम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय दादा साळुंखे, गोविंद सूर्यवंशी,नारायण सोमवंशी, राष्ट्रवादीचे नेते पंडितराव धुमाळ, शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, सुग्रीव सूर्यवंशी व पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे, रिपाईचे विलास सूर्यवंशी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, शहरप्रमुख सुनील नाईकवाडे,माजी शहरसंघटक हरिभाऊ सगरे, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, शहरउपप्रमुख माधव नाईकवाडे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वाजरवाडे, व्यापारी आघाडीचे तालुकासंघटक प्रसाद मठपती, महिला तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, शहरप्रमुख दैवता सगर, मुस्तफा शेख, पत्रकार मोहन क्षीरसागर, पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी परमेश्वर शिंदे, यशवंत बसपुरे, सतीश फट्टे, बलभीम कांबळे, शुभम डांगे, राहुल बिरादार, किशोर स्वामी, सोनू वाघमोडे,अजय वावरे, अमित घारोळे, सादिक पठाण, विठ्ठल जाधव, सतीश रुपनर, अशिष सुरवसे, श्रीनिवास भोसले, शिवाजी शिंदे, हूजुर मुजावर , लायकपाशा शेख आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments