“संत शिरोमणी सद् गुरू सेवालाल महाराजांनी समाजाला मानवतेचा मूलमंत्र दिला”
प्राचार्य प्रोफेसर सिद्राम डोंगरगे
लातूर :-(प्रतिनिधी)
संत शिरोमणी सद्गुरू सेवालाल महाराजांनी समाजाला मानवतेचा मूलमंत्र दिला व विज्ञानवाद आणि बुद्धिप्रामाण्यवादाचे धडे दिले त्यामुळेच त्यांना थोर समाज सुधारक म्हणून संबोधले जाते असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर सिद्राम डोंगरगे यांनी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि जयंती उत्सव समितीमार्फत संत शिरोमणी सद्गुरू सेवालाल महाराजांची २८३वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.संजय गवई, प्रा.धोंडीबा भुरे, डॉ.एम.बी.स्वामी, प्रा.भानुप्रकाश शास्त्री, प्रा.रवींद्र सुरवसे, प्रा.रवि सोनवणे, कार्यालय अधीक्षक गणेश शेटे, ए.जी.वाघमारे, रत्नेश्वर स्वामी, महादेव स्वामी, आत्माराम लोमटे, शुभम बिराजदार, संतोष येंचेवाड, केशव घंटे, अशोक शिंदे, प्रथमेश जाधव, महादेव चव्हाण यांची उपस्थिती होती
पुढे बोलताना प्राचार्य प्रोफेसर सिद्राम डोंगरे म्हणाले की, आज आपल्या महाविद्यालयांमध्ये सद्गुरू सेवालाल महाराज यांची जयंती आपण साजरी करत करीत आहोत ते युगप्रवर्तक, दिशादर्शक, थोर विचारवंत, आधुनिक भविष्यवेत्ता, समृद्ध व्यापारी, विश्वनायक आणि बंजारा समाजाचे आराध्य दैवत होते. त्यांच्या कार्याची माहिती आपण सर्वांनी समजून घेऊन त्याची प्रत्यक्ष मानवी जीवनात कृती केली पाहिजे असेही ते म्हणाले.

Post a Comment
0 Comments