*जागतिक महिला दिनी महिलांचे रक्तदान शिबीर संपन्न*
लातूर:
माऊली ब्लड सेंटर येथील महिला तंत्रज्ञानी रक्तादान शिबीराचे आयोजन माऊली ब्लड सेंटर येथे आयोजित केले होते. या रक्तदान शिबीरात रोहीनी कल्याणकर, नेहा हेडगिरे सह इतर अनेक महिलांनी रक्तदान केले.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. योगीता जाधव, सौ. बेबी सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्यां कांचन वाघमारे उपस्थित होत्या. माऊली ब्लड सेंटरच्या महिला तंत्रज्ञानी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत केक कापून महिला दिन साजरा केला. यावेळी मान्यवरांनी सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. रक्तदात्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या महिला दिनी महिलांनी आपले आरोग्य जपले पाहिजे. महिला कुटुंबातील सर्वाच्या आरोग्याची काळजी घेणारी स्त्री स्वतः च्या आरोग्याची काळजी घेत नाही. म्हणून स्रीयांच्या शरिरात रक्त कमी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे कुटुंबासोबत स्वतः च्याही आरोग्याची काळजी महिलांनी घ्यावी असे आवाहन सौ. योगीता जाधव यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्यां कांचन वाघमारे, सौ. बेबी सोनवणे यांनी मनोगत व्यक्ती करून महिलांना शुभेच्छा दिल्या. या महिला दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरासाठी जिजाबाई चुन्नीवाड, उज्वला चव्हाण, पुजा दहिफळे, लता गायकवाड , अनिता गायकवाड , धम्मशिला सुर्यवंशी, जास्मिन धाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमिला कांबळे यांनी केले. आभार कविता हुडे यांनी मानले.
रक्तदाना शिबीराच्या यशस्वीतेसाठी तंत्रज्ञ श्रीता गायकवाड, शिवानी गायकवाड, सानवी कुलकर्णी, उज्वला कानडे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments