महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील दुग्धशास्त्र विभाग प्रमुख प्रा.गुणवंत बिरादार यांना पीएच.डी.पदवी प्रदान
लातूर :-
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील दुग्धशास्त्र विभाग प्रमुख प्रा.गुणवंत संगप्पा बिरादार यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली त्यांनी “कॉलिटी असेसमेंट अँड प्रीजर्वेशन ऑफ चेवन वर्सेस मटन मार्केट ऑफ मराठवाडा रीजन” या विषयावर संशोधन केले असून त्यांना वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी येथील माजी दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एल.एम.करंजकर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील लाइफ सायन्स विभागांमध्ये पीएचडी मौखिक परीक्षा संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, स्कूल ऑफ लाइफ सायन्सचे संचालक डॉ.एस.पी.चव्हाण, तर विषय तज्ञ म्हणून अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भीमाशंकर ठोंबरे, सिनेट सदस्य डॉ.दीपक चाटे, माजी दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ.किरण दंडे, मराठी विभाग प्रमुख डॉ.रत्नाकर बेडगे, जवाहरलाल समाजकार्य महाविद्यालय, नांदेड येथील डॉ.रावसाहेब दोरवे आणि सहयोगी प्राध्यापक डॉ.संजय गवई यांची उपस्थिती होती.
यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू मा.डॉ.उद्धव भोसले यांनी डॉ. गुणवंत बिरादार यांचा सत्कार करून संशोधनातील झेड टेस्ट व निष्कर्ष या संबंधी चर्चा करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले तसेच प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंग बिसेन आणि कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांनीही सत्कार करून त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेतील सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर सिद्राम डोंगरगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.मनोहर कबाडे, एमसीव्हिसीचे उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, सर्व विभागप्रमुख, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments