Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*मुलगी वाचवा....मुलगी शिकवा !*

 


*मुलगी वाचवा....मुलगी शिकवा !*


👩👩👩👩👩👩🖊🖊🖊


*चला स्त्री जन्माचे स्वागत करूया*


*महिला दिनी मुलीला जन्म देणाऱ्या मातांचा पुष्पगुच्छ आणि पेन देऊन सत्कार*




लातूर - वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हा संदेश देण्यासाठी 8 मार्च रोजी मुलीस जन्म देणाऱ्या मातांचा पुष्पगुच्छ आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला. स्त्री जन्माचे स्वागत प्रत्येकाने करावे हा या उपक्रमातला संदेश.


लातूर शहरातील लेबर कॉलनी येथील शासकीय स्त्री रुग्णालयात हा उपक्रम राबविण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त ज्या मातांनी मुलींना जन्म दिला आहे अशा मातांचा पुष्प आणि पेन देऊन सन्मान करण्यात आला. आज आपण पाहतोय समाजात महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतात. मुलगी जन्माला नको हा अनेक पालकांचा अट्टाहास असतो. बहीण पाहिजे, आई पाहिजे, बायको पाहिजे, मैत्रीण पाहिजे मग मुलगी का नको. मुलींच्या जन्माचे स्वागत करूया हा संदेश या उपक्रमातून दिला. यावेळी प्रसूती करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक , सिस्टर संध्या गायकवाड सिस्टर  

गांधी r n सिस्टर व जन्मदाते माता नूरजहाँ शेख रहिमा तांबोळी शितल उदगीरे आरती वाघमारे दीक्षा चेवले  व वसुंधरा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक, कार्याध्यक्ष अमोल स्वामी वृक्ष लागवड अभियान प्रमुख राहुल माशाळकर आदींची उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments