*जागतिक महिला दिनानिमित्त सर्वरोग निदान शिबिर संपन्न*
राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेल उदगीर, लॉयन्स क्लब उदगीर सनरायजर्स व उदगीर लॅब असोसिएशन, मेट्रोपोलिस लॅब कलेक्शन सेंटर,मधुर डायबेटिस सेंटर तर्फे आयोजीत सर्व रोग निदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरात अल्प दरात मोती बिंदु शस्त्रक्रिया शिबीर,ब्लड शुगर,सी. बी.सी,हिमोग्लोबीन तपासणी,नेत्र,त्वचा,दंत रोग तपासणी तसेच लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रोक्त सुवर्ण बिंदु प्राशन देण्यात आले.
या कार्यक्रमास उपस्थित लॉयन्स क्लब उदगीर सनरायझर्स चे अध्यक्ष लॉ.योगेश चिद्रेवार , राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर,राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेल उदगीर तालुकाध्यक्ष लॉ डाॅ.भाग्यश्री घाळे,डॉ.सोनल कांडगिरे, डाॅ.विजय बिरादार,
डॉ प्रशांत नवटक्के, डॉ.सोनटक्के, डॉ. सौ दापकेकर, यांनी सेवा दिली उदगीरलैब असोसियेशन व लायन्स सनरायजर्स सचिव लॉ बाळु चिंचोळकर संत ज्ञानेश्वर प्रा शाळेचे संस्थापक गोविंदजी निटुरे काका, मुख्याध्यापिका सौ.अनिता जगताप ताई, माजी नगरसेवक विजय चवले,प्रा.मदन पाटिल नेत्रगावे,प्रा राम बेल्लाळे,श्री सुरेश तिवारी,श्री सचिन निरंकर,गणेश बुईतुरे, जयप्रकाश जाधव,संतोष पांढरे, केशव बिरादार,मेट्रोपौलिस कलेक्शन सेंटरचे जिल्हा प्रतीनिधी श्री ओंकार देवनाळे,उदगीर प्रतीनिधी शेख सद्दाम,शेख मुद्दबीर ,स्वप्निल गोखले,चंद्रकांत घवाने ,साईनाथ शेटकार,कु.सुष्मिता शिंदे,तुषार ढोने आदिनी परिश्रम घेतले यात cbc व हिमोग्लोबीन तपासणी 140,
डोळ्यांची तपासणी 110 रुग्ण यात मोफत ऑपरेशन चे 21रुग्ण,शुगर तपासणी 115,त्वचारोग रुग्ण 65,सुवर्ण बिंदु प्राशन 115 बालकाना देण्यात आले तर परिसरातील हजारी गरजू, रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मदन पाटील नेत्रगावे यांनी केले तर आभार बळवंत चिंचोलकर यांनी मांडले.

Post a Comment
0 Comments