*आजच्या महिलांना सक्षम बनवणे म्हणजे भारताचे भविष्य मजबुत करणे होय. -प्रा. अनिल बी. ठेंगे*
लातूर:-( प्रतिनिधी)
राजर्षी शाहू (स्वायत्त) महाविद्यालयातील गणित विभागाकडून व स्टूडेंट असोसिएशन ऑफ मॅथेमॅटिक्स अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त अभियांत्रिकी, गणितातील विज्ञान,तंत्रज्ञानातील महिला व पुढच्या पिढीला सक्षम बनवणे हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रो. एस. एन. शिंदे सर, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शिवाजी महाविद्यालयाचे गणित विभागाचे प्रा. आदरणीय अनिल बी. ठेंगे सर हे उपस्थित होते. सॅमचे डायरेक्टर गणित विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम. एस. वावरे सर, सॅमचे कॉर्डिनेटर डॉ. पिंपळे सर,सॅमचे अध्यक्षा कुमारी संजीवनी कदम, सॅमचे सेक्रेटरी विशाल बिराजदार, गणित विभागातील सोनवणे सर, सूर्यवंशी सर, शिंदे मॅडम यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती... सॅमचे सेक्रेटरी बिराजदार विशाल हे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून दिले, त्याचबरोबर प्रमुख पाहुण्याचे परिचय डॉ. एम. एस. वावरे सर यांनी करून दिले. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे आदरणीय ठेंगे सर आपल्या भाषणात असे सांगतात की महान गणितज्ञ शकुंतला देवी व आजच्या जगातील महिला, शैक्षणिक व राजकीय जीवनात महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, महिला सक्षमीकरणाची गरज का लागते याबद्दल त्यांनी आपल्या वाणीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,महिलांचे स्थान आजच्या पिढीत कोठे आहे याचे सुद्धा स्पष्टीकरण त्यांनी दिले, आपल्या भारतामध्ये 1936 ला पहिली एम. एस. सी. महिला बीबा चौधरी हे होत्या हे देखील आदरणीय प्रमुख पाहुणे माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उप-प्राचार्य यांनी केले अध्यक्षीय समारोप करताना ते असे म्हणाले की या जगाची खरी सुधारणा जर कोण केल असेल तर ते स्त्री केले, आई हे सर्वांचे रूप धारण करते असे आपले आदरणीय उप-प्राचार्य अध्यक्षीय समारोपामध्ये सांगितले, कार्यक्रमाचा सूत्रसंचालन सत्यजित पाखरे व निकिता बागडे यांनी केले व तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऋतुजा मलशेट्टे यांनी केले.

Post a Comment
0 Comments