*दिवाळीनिमित्त आरोग्य शिबिरांचे नियोजन*
लातूर:-( प्रतिनिधी)
दि.26/10/2022 रोजी गाव जानापुर ता.उदगीर जि. लातूर येथे शिबिरांचे आयोजन केले होते.या शिबिरामध्ये उद्घाटक बसवराज पाटील कोळखेडकर तर प्रमुख पाहुणे प्रदीप तोंडचिरकर,चंद्रकांत पाटील, रामेश्वर निटूरे,बामणी गावचे सरपंच राजकुमार बिरादार,रमेश अण्णा अंबरखाने,डॉ.व्यंकटेश वट्टमवार, डॉ.प्रशांत नवटके (मधुमेह तज्ञ) उपस्थित होते.
यावेळी 75 वर्षावरील व्यक्तींना काठी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला, तसेच एकूण 64 लोकांची मधुमेह व रक्तदाबांची तपासणी करण्यात आली.यामध्ये 18 जन मधुमेही तर 31 रक्तदाबाची रुग्ण आढळून आले. ही तपासणी स्वप्निल फुलारी, नवीन शृंगारे यांनी केली.आरोग्य शिबिराचे आयोजन कल्याण बिरादार (सरपंच जानापूर) यांनी केले.

Post a Comment
0 Comments