लातूर:-(प्रतिनिधी)
शिरोळ येथे अज्ञाताने आज एकाचवेळी दोन सोयाबीनच्या गंजी आणी एका शेतकऱ्याचा उभा उस पेटवुन दिला.
वामनराव जाधव आणि मैनुद्दिन सय्यद यांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आणि जलील सय्यद यांच्या ऊसाला अज्ञाताने आग लावलीआणि जलील सय्यद यांच्या उसाला अज्ञाताने आग लावली या आगीमध्ये प्रताप वामनराव जाधव यांचा अंदाज चार लाख रुपयाचा या आगीमध्ये प्रताप वामनराव जाधव यांचं अंदाजे चार लाख रुपयाचं आणि मैनोद्दीन सय्यद यांचे अंदाजे 2 लाख रुपयांचं सोयाबीन जळुन खाक झालं तसेच जलील सय्यद यांच्या उभ्या उसाला आग लागुन त्यांचंही अती नुकसान झालं.
अस्मानी संकट त्यात असं नीच कृत्य यातुन सावरु कसं ? मी जगु कसं ? असा टाहो शेतकऱ्यांनी फोडला. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवुन द्यावी आणी त्यांच्या फाटक्या संसाराला आधार द्यावा हीच मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments