Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*श्रीलंका बुद्ध धम्म दर्शन सहल २०२२ लातूरातून रवाना*

श्रीलंका बुद्ध धम्म दर्शन सहल २०२२ लातूरातून रवाना
लातूर :-(प्रतिनिधी)
प्राचीन काळात इ.स.पूर्व ०२ शतकात भारताचा प्राचीन राजा सम्राट अशोक यांनी श्रीलंकेत बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी आपला मुलगा भिक्खू महा महेंद्र आणि मुलगी भिक्खूनी संघमित्रा यांना धर्म प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पाठवले होते. तेव्हापासून आजपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र म्हणून जगामध्ये ख्यातीप्राप्त आहे. प्राचीन राजांनी श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात चैत्य, स्तूप, विहार आणि बुद्ध लेणी समूह निर्माण केले. आज श्रीलंकेचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याठिकाणी असलेली बौद्ध संस्कृती होय. जगामध्ये श्रीलंकेला परिपूर्ण बौद्ध राष्ट्र म्हणून ओळखले जाते. राजकुमार बुद्धाच्या पवित्र दंत धातू भारतातून कलीन प्रांतातून राणी हेमा यांनी नेऊन कॅन्डी शहरांमध्ये दंत धातूवर मोठे बुद्ध विहार निर्माण केले आहे. या सर्व घटनांचा अभ्यास व प्रत्यक्ष दर्शन व्हावे या दृष्टीकोनातून महाविहार धम्म केंद्र, सातकर्णी नगर, बार्शी रोड लातूरचे सचिव पूजनीय भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये श्रीलंकेमधील मदुरांकुली, अनुराधपूर, मिहीत्तले, पोलोनूरुवा, आलु विहार माताले, डंबूल, कॅंडी, कुर्णागल आणि कोलंबो या ठिकाणी अभ्यास सहल आयोजित करण्यात आली आहे. 
या अभ्यास सहलीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज हे सर्व जण श्रीलंकेला रवाना झाले आहे. यामध्ये पूजनीय भिक्खू पय्यानंद थेरो यांच्यासमवेत श्रामणेर भंते बुध्दशील, आर.पी.गायकवाड, महानंदा गायकवाड, रमेश श्रुंगारे, सुदाम बामणीकर, शोभा सुदाम बामणीकर, संघमित्रा कांबळे, उदय सोनवने, भगवान नरवाडे, मुकुंद वाघमारे, प्रणिता वाघमारे, श्यामल भालेराव, उमाकांत महालिंगे, सुधाकर कांबळे, पंडीत सुर्यवंशी, सुजाता सुर्यवंशी, राजकुमार गंडले, मिनाक्षी गंडले, सुहास रावळे, पुष्पक रावळे, सुर्यभान वीर, सुशिला भुताळे, अरुण गायकवाड, प्रभू शिवराम गायकवाड, भाऊराव कांबळे, सदानंद कापूरे, तुषार कांबळे, त्रिवेणी कसबे, प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे, सुमनबाई घोबले, मंगल कांबळे आणि अमृता कांबळे या सर्व उपासक-उपासिका यांचा समावेश आहे. ही धम्म सहल सर्व सुखसोयींनी युक्त असून यामध्ये विविध प्रेक्षणीय स्थळांना सुद्धा भेटी देण्यात येणार आहे. 
पूजनीय भिक्खू पय्यानंद थेरो, श्रामणेर भंते बुध्दशील आणि सहभागी सर्वाना चलो बुध्द कि ओर अभियानाचे प्रमुख मुख्याध्यापक डी.एस.नरसिंगे, चेअरमन विठ्ठल जाधव, मा.ना.गायकवाड, अमित शृंगारे, डॉ.अरुण कांबळे, शीलरत्न माने, बेबीताई कांबळे आणि डॉ.संजय गवई आणि लातूरतील बौद्ध उपासक-उपासिका यांनी हार्दिक सुभेच्छा दिल्या आहेत.  

Post a Comment

0 Comments