लातूर :-(प्रतिनिधी)
ग्लोबल अंडर इंडेक्स (जागतिक भूक निर्देशांक) अहवालानूसार श्रीलंकेची अर्थिक टंचाई आणि उपासमारी बाबतीची स्थिती समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. श्रीलंकेतील अनुराधापूर येथे दौऱ्यावर असलेले कै.व्यंकटराव देशमुख महाविदयालय, बाभळगाव जि.लातूर येथील प्रभारी प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे यांनी तेथील सर्व सामान्य लोकांशी संवाद साधला तेव्हा तेथील परिस्थितीमध्ये त्यांना सुधारणा होताना दिसून आली आहे. सिंहल बेटावरील रहिवासी आर्थिक संकट मान्य करत नाही तर ते येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्यास तयार आहे. उपातीसा गावातील गावकरी आम्हाला रोजगार पाहिजे, महागाई दुपटीने वाढली परंतु त्यामानाने रोजगार वाढला नाही आणि तो आम्हाला मिळत नाही. तेव्हा आपण भारतीय नागरिकांनी श्रीलंका सरकारचे आर्थिक बजेट पूर्ववत करण्यासाठी पर्यटक म्हणून आले पाहिजे, पर्यटक वाढले तर रोजगार वाढणार आहे, ती खूप मोठी श्रीलंकन बौद्ध बांधवासाठी पर्वणी ठरेल अशी आर्त हाक तेथील रहिवाशी यांनी पूज्य भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या श्रीलंका बुद्ध धम्म दर्शन सहल २०२२ मधील सर्वाना केली.
महाविहार धम्म केंद्र, सातकर्णी नगर, बार्शी रोड लातूरचे सचिव पूजनीय भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये श्रीलंकेमधील मदुरांकुली, अनुराधपूर, मिहीत्तले, पोलोनूरुवा, आलु विहार माताले, डंबूल, कॅंडी, कुर्णागल आणि कोलंबो या ठिकाणी अभ्यास सहल आयोजित करण्यात आली आहे.
श्रीलंका बौद्धदर्शन अभ्यास सहल श्रीलंकेची राजधानी अनुराधापूर येथील आठ स्तूपाचा अभ्यास करून पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर ते दुसर्यान टप्प्याला कॅण्डी येथून प्रारंभ करण्यात येईल अशीही माहिती प्रभारी प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे यांनी थेट श्रीलंका येथून दिली आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये समाजस्थिती सोबत धम्म अभ्यासामध्ये तथागताचे पाचशे अरहंत शिष्य आणि मिरीसवेटीया, स्थूमारामया, अभयागिरी म्युझियम, अभयागिरी स्तूप, समाधी बुद्ध, लंकारामया, मूनस्टोन, श्रीमहाबोधी वृक्ष स्थळांना सहभागी धम्म अभ्यास सहलीतील बांधवांनी भेटी दिल्या. त्यामध्ये पूजनीय भिक्खू पय्यानंद थेरो यांच्यासमवेत श्रामणेर भंते बुध्दशील, आर.पी.गायकवाड, महानंदा गायकवाड, रमेश श्रुंगारे, सुदाम बामणीकर, शोभा सुदाम बामणीकर, संघमित्रा कांबळे, उदय सोनवने, भगवान नरवाडे, मुकुंद वाघमारे, प्रणिता वाघमारे, श्यामल भालेराव, उमाकांत महालिंगे, सुधाकर कांबळे, पंडीत सुर्यवंशी, सुजाता सुर्यवंशी, राजकुमार गंडले, मिनाक्षी गंडले, सुहास रावळे, पुष्पक रावळे, सुर्यभान वीर, सुशिला भुताळे, अरुण गायकवाड, प्रभू शिवराम गायकवाड, भाऊराव कांबळे, सदानंद कापूरे, तुषार कांबळे, त्रिवेणी कसबे, सुमनबाई घोबले, मंगल कांबळे आणि अमृता कांबळे या सर्व उपासक-उपासिका यांचा समावेश आहे. या सर्वांचे लातूरमध्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment
0 Comments