महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात गणेश चव्हाण आणि कु.पद्मजा पांचाळ यांचा सत्कार
लातूर :-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, लातूर कार्यालय अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक लातूर आणि जयक्रांती महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एच.आय.व्ही./एड्स जनजागरणाकरिता जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये समाजकार्य विभागातील गणेश चव्हाण आणि कु.पद्मजा पांचाळ यांनी द्वितीय पारितोषिक रु.२००० रोख आणि प्रमाणपत्र प्राप्त केले. त्याबद्दल विजेत्या स्पर्धकांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, समाजकार्य विभाग प्रमुख डॉ.दिनेश मौने, प्रा.काशिनाथ पवार, डॉ.संजय गवई, डॉ.आनंद शेवाळे आणि प्रा.रविंद्र सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी या दोन्ही विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांचे श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूरचे सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, सर्व उपप्राचार्य, सर्व शाखा समन्वयक, सर्व विभाग प्रमुख, समाजकार्य विभागातील प्रा.आशिष स्वामी, प्रा.दत्ता करंडे, प्रा.नागेश जाधव, प्रा.मारुती माळी, गणेश शेटे, वीरसेन उटगे, नंदू काजापुरे, बालाजी डावकरे, व्ही.एन.वलांडे, संतोष येचवाड यांच्यासह समाजकार्य विभागातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments