-युवक काॅंग्रेस तालुकाध्यक्ष मदन बिरादार
निलंगा:-( प्रतिनिधी)
तगरखेडा मोड ते तगरखेडा गावापर्यंत रस्त्यालगतचे नाली उपसा व रस्ता डांबरीकरण लवकरात लवकर करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिरादार यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग निलंगा यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मौजे तगरखेडा तालुका निलंगा येथील तगरखेडा मोड ते तगरखेडा गावापर्यंत जाणारा रस्ता हा पूर्णतः नादुरुस्त झाला असून सदरील रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना वाहतूक करणे गैरसोयीचे होत आहे परिणामी खड्ड्यांमध्ये मोठी वाहने अडकून वाहतूक कोळंबा होत आहे तसेच लहान वाहनांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाली बुजून गेली असून त्यामुळे शेतामधील पाणी हे रस्त्यावर येत आहे.
तरी आपल्या कार्यालयास वारंवार कल्पना व भ्रमणध्वनी द्वारे कळवून ही अद्याप पर्यंत कुठलीच कारवाई केली गेली नाही तरी आपणास विनंती की आपण तगरखेडा मोड ते तगरखेडा गावापर्यंत रस्त्यालगतचे नाली उपसा व रस्ता डांबरीकरण करणे साठी योग्य ती लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा 16 नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करू याची नोंद घ्यावी असे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर शहराध्यक्ष मुजीब सौदागर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिरादार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी तालुकाध्यक्ष मदन बिरादार, शहराध्यक्ष मुजीब सौदागर, प्रशांत बिरादार, राहुल डावरगावे आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments