*व्हालीबाॅल जिल्हा संघात तगरखेडच्या साहारा स्पोर्टचे तीन खेळाडू*
लातूर:-(प्रतिनिधी)
अर्जुन नगर, जिल्हा कोल्हापूर येथे होत असलेल्या राज्य स्तरीय वरिष्ठ गट पुरुष व्हालीबॉल (सीनियर स्टेट चैंपियनशिप) स्पर्धेसाठी तगरखेडा येथील साहारा स्पोर्ट चे तीन खेळाडूची जिल्हा संघामधे निवड झाली आहे. खेळाडू
1. आजर बागण
2. समीर शेख
3. काशिफ फकीर
हे तीन खेळाडू राज्य स्तरीय व्हालीबॉल स्पर्धे साठी संघात सामिल झाले आहेत याबद्दल लातूर जिल्हा व्हालीबॉल असोसियशन चे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बालासाहेब जाधव लातूर जिल्हा व्हालीबॉल असोसियशन चे सचिव प्रा. डी.डी हांडे सर लातूर विभागीय सचिव प्रा. विजय हांडे सर व नेशनल कोच दीपक पाटिल सर यांनी सर्वांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले .या संघाचे प्रशिक्षक म्हणून दीपक पाटिल हे काम पाहत आहेत.
आम्ही तगरखेडकर ग्रूप तर्फे या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


Post a Comment
0 Comments