औराद शहाजानी :-
येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत दि.२३ जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आझादी की मशाल रॅलीचे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट डाॅ.जाफर चौधरी, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी आझादी की मशाल रॅलीच्या वतीने डाॅ.गौरव जेवळीकर, डाॅ.साईनाथ उमाटे, डाॅ.सुदर्शन पेडगे व विद्यार्थी उपस्थित होते. डाॅ.साईनाथ उमाटे यांनी आझादी की मशाल रॅलीच्या आयोजनाची भूमिका विशद करून मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील यांनी आझादी की मशाल रॅलीस शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी आझादी की मशाल रॅलीच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मौलिक योगदान देणाऱ्या थोर महापुरुषांच्या जीवन व कार्यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील व आझादी की मशाल रॅलीच्या पदाधिकाऱ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. अक्षता खेळगे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. बालाजी आचवले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक लेफ्टनंट डाॅ.जाफर चौधरी यांनी केले. याप्रसंगी डाॅ.सचिन हंचाटे, प्रा.मुश्ताक रक्साळे, डाॅ.नागनाथ तेलंगे, प्रा.श्रीकांत ढेबे, डाॅ.शंकर कल्याणे, डाॅ.आनंद मुसळे, डाॅ.रितेश व्यास, प्रा.आशीष खडकेश्वर, डाॅ.सुचिता किडीले, डाॅ.सत्यशीला जोंधळे, डाॅ.शीतल गुंजटे, मोईन आळंदकर, विलास होटकर, व्यंकट शिवणे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments