औराद शहाजानी (प्रतिनिधी) :
येथील महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात नेताजींच्या प्रतिमेला चंद्रकांत वलांडे आणि ज्ञानेश्वर थेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. या दिनाचे औचित्य साधुन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सोहम बिराजदार, राधा मरगणे, स्नेहा मरगणे, कांबळे पलक आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नाईकवाडे नूजत, जाधव किरण, प्रसाद गवंडगावे आदींनी भाषण केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात जयंती साजरी केली.
सुभाषचंद्र बोस यांची शिस्त, शौर्य आणि साहस हे गुण विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी बाळगावे. त्यांचे कार्य, पराक्रम आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन बालाजी मरळे यांनी केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर अंकुश पानढवळे यांनी प्रकाश टाकला. सुमैया नाईकवाडे पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे, उपाध्यक्ष प्रेमचंद बियाणी, सचिव रमेश बगदूरे, सहसचिव राजेश वलांडे, संचालक मंडळ, मुख्याध्यापक महेबूब लष्करे यांनी चिमुकल्यांचे कौतुक केले. याप्रसंगी रमेश थेटे, संजय कुलकर्णी, संदीप मिरगुडे, अल्ताफ पठाण, शोभा बिराजदार, जगदेवी स्वामी, हेमा मोरे, सोनाली कुंभार व मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments