Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे मोटार सायकल रॅली करून अभिवादन*

*शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे मोटार सायकल रॅली करून अभिवादन*

निलंगा /प्रतिनिधी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज निलंगा शिवसेनेच्या वतीने भव्य अशी मोटार सायकल रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाविकास आघाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 
 शिवसेनेचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या आदेशानुसार निलंगा तालुका शिवसेनेच्या वतीने आज निलंगा शहरांमध्ये भव्य दिव्य अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली हाडगा नाका येथील शिवसेना कार्यालयापासून रॅली ची सुरुवात करण्यात आली ती छत्रपती शिवाजी महाराज चौक जिजाऊ चौक ते संभाजी चौक दादा पीर दर्गा रोड मार्गे दापका वेस महारुद्र चौक जुने पोलीस ठाणे आनंदमुनी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी रॅली काढण्यात आली व यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील शिवसेनेचे औसा विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य निलंगा विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे  युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब मिरगाळे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मुस्तफा शेख अर्जुन नेलवाडे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम काँग्रेसचे गोविंदराव सूर्यवंशी गणराज संघाचे रामलिंग पटसाळगे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे राष्ट्रवादीचे अंगद जाधव 
 ज्येष्ठ शिवसैनिक वामनराव सूर्यवंशी युवा सेनेचे विधानसभा संघटक अनिल अरिकर  शिवसेनेचे उपशहर प्रमुख माधव नाईकवाडे संतोष मोघे शाहूराज फट्टे महबूब मिस्तरी व्यापारी आघाडीचे किशनराव मोरे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महादेवी पाटील महिला आघाडीच्या तालुका संघटिका रेखाताई पुजारी शहर संघटिका दैवता सगर सविता पांढरे अरुणा माने  युवा सेनेचे विश्वा रेशमे अविष्कार सगरे ओंकार सगरे देवराज साळुंखे शुभम मोघे दत्ता पेटकर  कृष्णा शेंडगे निलेश बंडगर शुभम मोघे निखिल मोहोळकर  यांच्यासह शेकडो युवासैनिकासह शिवसैनिकांनी मोटार सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदवून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments