*महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
औराद शहाजानी (प्रतिनिधी) : शारदोपासक शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र विद्यालय प्राथमिक शाळा,औराद शहाजानी येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री बस्वराज वलांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री रमेश बगदुरे उपस्थित होते.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष भाषण स्पर्धा आणि विविध स्वातंत्र्यसेनानींची हुबेहूब वेशभूषा करून वेधले. मरगणे राधा, किरण जाधव, कांबळे पलक, मरगणे स्नेहा, रासुरे वैष्णवी, मिटकले आदिती, आनंदी या विद्यार्थ्यांनी बलसागर भारत होवो, मेरा मुल्क मेरा देश...आदी देशभक्तीपर गीत सादर केले. विजय कुलकर्णी या विद्यार्थ्याने इंग्रजीमधून प्रभावी भाषण केले. अंकिता गड्डीमे, नुजत नाईकवाडे, सोहम बिराजदार, गवंडगावे प्रसाद, गौरव पानढवळे आदी विद्यार्थ्यांनी भाषण केले. संस्थेचे माजी अध्यक्ष कै. विश्वनाथराव वलांडे गुरुजी यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू वैजनाथआप्पा वलांडे यांच्याकडून स्पर्धा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश पानढवळे तर प्रास्ताविक व आभार बालाजी मरळे यांनी केले. याप्रसंगी संचालक मडोळया मठपती, दगडू गिरबणे, मुख्याध्यापक महेबूब लष्करे, आळंदकर सर, सेवानिवृत्त शिक्षक, पालक प्रतिनिधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कै. व्यंकोबाजी डोईजोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment
0 Comments