लातूर:-( प्रतिनिधी)
उमेद बचत गटाच्या उत्पादित विविध वस्तूचे विक्री व प्रदर्शन तथा सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी
उमेद अभियान - Maharashtra State Rural Livelihoods Mission अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, MSRLM Latur -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नतीअभियान,लातूर जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, लातूर यांच्या वतीने दि. 26 ते 30 जानेवारी 2023 कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे जिल्ह्यातील उमेद बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूचे विक्री व प्रदर्शन हिरकणी हाटचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी हिरकणी हाटचा शुभारंभ मा. जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीराज बी.पी. सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, लातूर महानगर पालिका आयुक्त श्री. बाबासाहेब मनोहरे, प्रकल्प संचालक श्रीमती. कल्पना क्षीरसागर, जिल्हा कृषी अधीक्षक श्री. दत्तात्रय गावसाने व जिल्हा अभियान व्यवस्थापक देव कुमार कांबळे आणि जिल्ह्यातील सर्व अधिकारी हे उपस्थित होते.
पाच दिवस चालणाऱ्या या विक्री व प्रदर्शनामध्ये विविध वस्तूचे एकूण 80 स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये *हस्तकला, मसाले,ज्वारी,बाजरी,नाचणीचे विविध पौष्टिक पदार्थ,गांडूळ खत,LED बल्ब, बंजारा आर्ट,सेंद्रिय गूळ व मध तसेच खाद्यपदार्थ यामध्ये निलंगा राईस, बोरसुरी वरण, दही धपाटे,बासुंदी ,शेंगदाणा पोळी,खवा पोळी या स्टॉलचे खास आयोजन करण्यात आलेले आहे*. यासोबतच दररोज सायंकाळी विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे विक्री व प्रदर्शन सुरू असून सर्व लातूरकरांनी स्टॉलला भेट देऊन विविध वस्तूंची खरेदी करून ग्रामीण भागातील महिलाचां उत्साह वाढवावा असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी केले आहे.
प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक विपणन वैभव गुराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हा व्यवस्थापक श्रीमती अनिता माने श्री. पांडुरंग जेटनवरे, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, सर्व तालुका व्यवस्थापक आणि सर्व प्रभाग समन्वयक हे परिश्रम घेत आहेत.

Post a Comment
0 Comments