लातूर:
53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरचे नवनियुक्त कमांडिंग ऑफिसर कर्नल हेमंत जोशी, लेफ्टनंट कर्नल संतोष कुमार, सुभेदार मेजर शंभू सिंग, यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयास दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी कमांडिंग ऑफिसर कर्नल हेमंत जोशी यांनी एनसीसी कॅडेटसना मार्गदर्शन केले. चारित्र्यवान युवक निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य राष्ट्रीय छात्र सेना करत असते. एक सुसंस्कारित पिढी घडविण्याचे महत्वाचे काम राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातुन होत असल्याचे प्रतिपादन कर्नल हेमंत जोशी यांनी केले. त्यांनी भावी काळात देशभरात एनसीसीच्या होणाऱ्या विस्ताराबाबत चर्चा करून समाधान व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. ओमप्रकाश शहापूरकर, लेफ्ट. डॉ. अर्चना टाक , सीटीओ डॉ. महेश वावरे, एसयुओ ओंकार कनामे, सीपीएल सुयश टेकाळे व इतर कॅडेट उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments