*महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात शिवजयंती विविध कलाविष्कार सादर करून उत्साहात साजरी*
औराद शहाजानी (प्रतिनिधी) :
येथील महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मुख्याध्यापक महेबूब लष्करे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा, पोवाडे, भाषण, नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आले.
विद्यालयातील रुद्र निरगुडे, श्रीकांत नेत्रगावे, सोहम बिराजदार, सोहम भोसले आदी विद्यार्थ्यांनी भाषण केले. रासुरे वैष्णवी, राधा मरगणे, नुजत नाईकवाडे, पलक कांबळे, शेरीकर जिया, दर्शना पंचगल्ले आदी मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणी आल्या त्यावर मात करून शिवाजी महाराज पुढे गेले. जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले व स्वराज्याची स्थापना केली. आपल्यापेक्षा प्रबळ शत्रूला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाहीत असे प्रतिपादन बालाजी मरळे यांनी केले. कांबळे पलक या मुलीने 'दैवत छत्रपती....' आदिती मिटकले रासुरे वैष्णवी, कांबळे पलक या मुलींनी 'एकच राजा इथे जन्मला'....या गीतावर ठेका धरून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आवडीने जयंती साजरी केली. कार्यक्रमाचे आभार महेबूब लष्करे यांनी मानले. शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे, उपाध्यक्ष प्रेमचंद बियाणी, सचिव रमेश बगदुरे, सहसचिव राजेश वलांडे, संचालक मंडळ, मु.अ.महेबूब लष्करे यांनी चिमुकल्यांचे कौतुक केले. याप्रसंगी चंद्रकांत वलांडे, ज्ञानेश्वर थेटे, रमेश थेटे, संजय कुलकर्णी, संदीप मिरगुडे, अभिषेक बेळंबे, शोभा बिराजदार, जगदेवी स्वामी, हेमा मोरे व मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments