Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*महिला दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे सर्वरोग तपासणी शिबिर व प्रथिनेयुक्त आहाराचे वाटप*

*महिला दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे सर्वरोग तपासणी शिबिर व प्रथिनेयुक्त आहार चे वाटप*
  लातूर:-(प्रतिनिधी)

8 मार्च 2023 महिला दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे सर्व रोग तपासणी शिबिर व प्रथिनेयुक्त युक्त आहाराचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेखा निलंगेकर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुरेखा काळे या होत्या. ग्रामीण रुग्णालय बाभळगाव चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर यांच्या संकल्पनेतून प्रथिने युक्त आहाराचे वाटप करण्यात आले यावेळी परिसरातील सर्व महिलांना प्रथिने युक्त तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. रीना जयस्वाल, डॉ. रंजीता शिसोदे, डॉ. स्वाती कॉम्पले , डाॅ.उज्वला मोरे, डॉ. शिल्पा चिंचोलकर, सविता नेहरकर तसेच 108 चे सर्व महिला डॉक्टर्स, सर्व परिचारिका यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी सक्षम होऊन आपल्या पायावर उभे टाकले पाहिजे, पुरुषाच्या बरोबरीने काम केले पाहिजे कुठल्याही क्षेत्रात मागे न राहता पुढे गेले पाहिजे असे आवाहन डॉ. सुरेखा काळे यांनी केले तर मुलगी शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे महिला सबलीकरण झाले पाहिजे असे डॉ. सुरेखा निलंगेकर यांनी मत व्यक्त केले, तर शासनाच्या विविध योजनेचा फायदा सर्वांनी घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ मीरा चिंचोलीकर यांनी केले. यावेळी परिसरातून मोठ्या प्रमाणात महिलांची तसेच आशा कार्यकर्ते यांची गर्दी जमली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जितेन जयस्वाल यांनी केले तर आभार डॉ.शुभांगी कुटवाड यांनी व्यक्त केले. यावेळी प्रसूती झालेल्या मातांना साडीचे वाटप करण्यात आले. तर शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी ग्रामीण रुग्णालय बाभळगाव चे सर्व स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments