*निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे ''हात से हात जोडो'' अभियान उत्साहात सुरू*
मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
निलंगा:-(प्रतिनिधी)
निलंगा तालुका काँग्रेस कमिटीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिलेल्या "हात से हात जोडो" या अभियानाचे शुभारंभ आज ११ मार्च रोजी तांबरवाडी येथुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे सह प्रभारी मां श्री अभय दादा साळुंके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे खासदार व नेते राहुलजी गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो अभियाना चा समारोप 30 जानेवारी रोजी झाला असून त्याचा पुढचा टप्पा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने हात से हात जोडो अभियान सुरू करण्यात आले. या उपक्रमामध्ये राहुल गांधींनी गेल्या जवळपास दीडशे पेक्षा जास्त दिवसांमध्ये आपल्याला आलेले अनुभव, सर्वसामान्य माणसाच्या व्यथा, देशात वाढलेली बेरोजगारी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, दिन दलित व कष्टकऱ्यांचे प्रश्न या सर्व प्रश्नासंदर्भात देशवासीयांना पत्राद्वारे आवाहन केले असून हे पत्र संबंध देशवासीयांना घरोघरी जाऊन देण्याचा उपक्रम हात से हात जोडो या अभियानातून सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम पुढील दोन महिने चालणार असून निलंगा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक घरापर्यंत जाऊन राहुल गांधींचे विचार, भारत जोडो यात्रेचा हेतू व हात से हात जोडो या अभियानाचा उद्देश जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मां श्री अभय दादा साळुंके, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सुधाकर दाजी पाटील, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री विजयकुमार जी पाटील, कार्याध्यक्ष श्री नारायण जी सोमवंशी, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती श्री अजित नाना माने, श्री मदरसे सर, श्री माधवराव पाटील,
युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष श्री मदन बिरादार, काँग्रेस सोशल मीडिया चे तालुकाध्यक्ष श्री अमोल शिंदे, अमोल नवटके, व ग्रामस्थ तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments