*निलंगा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित हात से हात जोडो अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील पहिला दिवसाचा समारोप*
निलंगा:-(प्रतिनिधी)
दिनांक ११मार्च २०२३ ला हात से हात जोडो अभियाना संबंधित निलंगा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे फिरता दौरा व कॉर्नर सभेचे आयोजन केले होते अतिशय सुंदर आणि ग्रामस्थांच्या समावेत खेळी मेळीच्या वातवरांत पहिला दिवस पार पडला पहिलाच दिवस आणि त्यात जनतेतील असा प्रतिसाद पाहून असे वाटते की येणाऱ्या काळात लोकशाही जिवंत राहील.
सकाळी सुरूवात तांबरवाडी, हालसी पासून झली नंतर संध्यकळी तगरखेडा येथे मोठ्या उत्साहात शेकडो जनतेच्या उपस्थित पहिल्या दिवसाचा समारोप झाला.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मां. श्री अशोकराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे सह प्रभारी मां. श्री अभय दादा साळुंके लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सुधाकर दाजी पाटील, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष श्री विजयकुमार जी पाटील, कार्याध्यक्ष श्री नारायण जी सोमवंशी, तगरखेडचे माजी सरपंच वैजनाथ वलांडे, चेअरमन रमेश राघो ,पांडुरंग थेटे, निलंगा तालुका युवक काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष तथा तगरखेडचे उपसरपंच श्री मदन बिरादार, निलंगा तालुका काँग्रेस सोशल मीडिया कमिटीचे तालुकाध्यक्ष श्री अमोल शिंदे, रणजित सूर्यवंशी, दिलीप कलगाणे,शंकर बिरादार, राहुल पाटील ,विजयकुमार कलगाणे ,विनोद पाटील ,दस्तगीर आतार, मुस्तफा अत्तार ,मनोज स्वामी, शिवाजी बिरादार ,श्रीकृष्ण गिरी, प्रशांत बिरादार ,राहुल डावरगावे, नागेश राघो, गणेश षटगार, आनंद पाटील आदि ग्रामस्थ व निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments