Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*महाराष्ट्र राज्य सकल सुतार समाजाचा अधिवेशन पूर्व मेळावा संपन्न*


*महाराष्ट्र राज्य सकल सुतार समाजाचा अधिवेशन पूर्व मेळावा संपन्न*

लातूर:-(प्रतिनिधी)

 5 मार्च रोजी विश्वकर्मा गार्डन फंक्शन हॉल लातूर येथे महाराष्ट्र राज्य सुतार समाज भव्य अधिवेशन पूर्व  मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री मुरलीधर पांचाळ होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये श्री गणपतराव गायकवाड अण्णा  होते. मेळाव्याची सुरुवात यांच्या प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमा पूजनाने झाली , मेळाव्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक चंद्रकांत पांचाळ सर यांनी केले

प्रास्ताविक व अधिवेशनाची  संकल्पना सतिश शिंदे चिखली बुलढाणा यांनी  मांडतांना ना नेता, ना संघटना, ना व्यक्ती,  ना समिती, फक्त सुतार समाज केंद्रस्थानी मानून सदर महाराष्ट्र सुतार समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होईल , यासाठी राज्यातील समस्त विश्वकर्मा सुतार समाजाचा उस्फुर्त पाठींबा मिळत आहे  .असेही सांगितले तर या अधिवेशनासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून सकारात्मक विचाराने प्रतिसाद देणारे व अधिवेशनासाठी सक्रीय सहभागी होणाऱ्या बांधवांची टीम सुतार बनविण्यात येणार आहेत   भूमिका मांडतांना हनुमंतराव पांचाळ यांनी सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात अशाप्रकारे मेळावे घेवुन अधिवेशनाचा संदेश प्रत्येक  गावागावांत जावून द्यावा प्रसार प्रचार करावा असे आवाहन केले , उपस्थित सर्व बांधवांनी मनोगत व्यक्त करतांना ,  धार्मिक स्थळी अधिवेशन व्हावें यासाठी आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे आद्य संत भोजलिंग काका महाराज यांची व संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आहे व त्यांचे संपूर्ण जीवन कार्य तिथे घडलेली आहे त्या आळंदी येथे घ्यावे असे एकमताने ठरले आहे. या मीटिंग मध्ये सुरेश आगलावे, विद्यानंद मानकर सर ,विष्णू बाप्पा पांचाळ,गोपीचंद पांचाळ , रविंद्र रायकर, संदीप दीक्षित महाराज, किस्किंदाताई पांचाळ, समीर भालेकर यांनी अधिवेशन कसे यशस्वी करता येऊ शकेल यासाठी मार्गदर्शनपर मनोगते  व्यक्त केली. अध्यक्षीय भाषण करतांना  समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करावे असे सांगितले .
  सदर मेळाव्यास  विविध जिल्ह्यातील तथा लातूर जिल्ह्यातून शेकडो बांधव हजर होते .
 अनिल पांचाळ ,सुदर्शन बोराडे ,ह. भ. प नंदू महाराज पांचाळ, विष्णू बाप्पा पांचाळ, बळवंत पांचाळ, मुरलीधरराव पांचाळ, भागवत पांचाळ, सुदाम पांचाळ, मल्लिनाथ पांचाळ, संतोष पांचाळ ,विरनाथ पांचाळ ,जनार्दन पांचाळ, श्री प्रमोद पांचाळ ,हरी पांचाळ ,विश्वनाथराव पांचाळ, रामराव पांचाळ,जगन्नाथ लोहारे सतीश दीक्षित, दत्तात्रेय सुतार इ. उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments