.
औराद शहाजानी (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात शहीद दिन साजरा करण्यात आला. शहीद- ए-आझम सरदार भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक महेबूब लष्करे व चंद्रकांत वलांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या कार्यावर बालाजी मरळे यांनी प्रकाश टाकला. विद्यालयातील सोहम निरगुडे, नंदे धीरज, विजय कुलकर्णी, किरण जाधव, नंदे आरुषी, निरगुडे रुद्र, गौरवी पानढवळे आदी विद्यार्थ्यांनी भाषण केले. श्रावणी ढोरशिंगे, कांबळे पलक, मरगणे राधा, मरगणे स्नेहा, देवनाळे जोया, रासुरे वैष्णवी, गौरव पानढवळे आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार अंकुश पानढवळे यांनी मानले. हा कार्यक्रम मुख्याध्यापक महेबूब लष्करे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. याप्रसंगी ज्ञानेश्वर थेटे, रमेश थेटे, संजय कुलकर्णी, संदीप मिरगुडे, अभिषेक बेळंबे, अल्ताफ पठाण, शोभा बिराजदार, जगदेवी स्वामी, हेमा मोरे, सोनाली कुंभार व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments