*शैक्षणिक विश्व निर्माण करणारे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिक्षण महर्षी-शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रध्देय विश्वनाथराव वलांडे गुरुजी*
गुरु ही एक संस्कृत संज्ञा आहे जी विशिष्ट ज्ञान किंवा क्षेत्रातील "शिक्षक, मार्गदर्शक किंवा तज्ञ" यासाठी वापरली जाते. आमचे गुरुजी हे त्या गुरुंचे गुरुजी हाेते आहेत अथांग ज्ञानाचा सागर या ज्ञानीला न्यायदेवताही सन्मानाने वागवत असे आजही त्यांचे विचार आदर्श आहेत औराद शहाजानी हे एक आर्य चळवळीचे प्रमुख केंद्र अशा या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ग्रामीण भागातील जनता शैक्षणिक
दृष्ट्या उज्वल स्वयपुर्ण व्हावी या उदात्त हेतूने गुरुजींनी आपल्या सहकारी टीमसह महाराष्ट्राच्या शेवटच्या गावामध्ये शिक्षणाचा केजी ते पीजी असा पाया सीमा भागातील मराठी भाषीक हा मागासलेला शिक्षणापासून वंचित राहिलेला भाग या भागामध्ये गुरुजींनी स्वता शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून मेहकर येथे सेवा केली या भागाचा परिपूर्ण अभ्यास केला होता महाराष्ट्रातील जनते सोबत हा माझा कर्नाटकातील मराठी भाषीक सुधारला पाहिजे तो शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे या हेतूने गुरुजींनी त्यांच्या टीमने अथक परिश्रम करून शैक्षणिक कार्य सुरू केले शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील नामवंत कलावंत मनमुराद पणे गुरुजींच्या व त्यांच्या साथीदारांच्या या शैक्षणिक कार्याला भरभरून साथ दिली या तेरणेच्या काठावरती थाेर कलावंत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने हे विशाल शैक्षणिक वैभव याच्या जाेडीला ईतर शैक्षणिक युनिट यातुन हजारो तरुण आज देश विदेशात विविध क्षेत्रात सेवा बजावत आहेत स्वर्गीय गानसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांचा तो " माेगरा फुलला "सूर आजही तेरणातिरी पाण्याच्या लाटेवर स्वर घुमत दिदीच्या आठवणीचा झरा खळखळ वाहताेय लतादिदीचे औराद हे गाव अशी ओळख निर्माण झाली हाेती दिदीचे ज्या दिवशी निधन झाले त्यादिवशी देशातील विविध भागातून फाेन सुरु झाले औराद लतादीदी हे काय नाते आहे ? त्यावेळी अनेक मिडीया गुरुजींची मुलाखत घ्यायला औराद येथे आला आम्ही घेतलेली गुरुजींची ती शेवटची मुलाखत लिहण्याविषयी भरपुर आहे शब्द अपुरे आहेत शैक्षणिक विश्व निर्माण करणारे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिक्षण महर्षी शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रध्देय विश्वनाथराव वलांडे गुरुजी यांना प्रथम पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻
शब्दांकन बालाजी थेटे

Post a Comment
0 Comments