निलंगा:
प्रत्येक गावातच नाही तर प्रत्येक प्रभागांमध्ये युवा सेनेच्या शाखा स्थापन करणे व प्रत्येक घराघरात युवासैनिक तयार करावा असे मत लातूर जिल्ह्याचे युवासेनेचे विस्तारक देवेंद्र भाऊ कांबळे यांनी शासकीय विश्राम लातूर येथे आयोजित केलेल्या बैठकी प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब व युवा सेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने प्रत्येक गावातच नव्हे तर प्रभाग निहाय शाखा स्थापन करून पक्ष संघटन वाढवणे, बुथ प्रमुखाची नियुक्ती करणे, गटप्रमुख व गणप्रमुखाची नियुक्ती करणे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युवा सेनेच्या वतीने संपूर्ण ताकद लावून पंचायत समिती व जिल्हा परिषद लढवून युवा सैनिक निवडून आणण्याची जबाबदारी युवासैनिकांनी सांभाळावी. येणारा काळ हा आपल्या पक्षाचाच आहे व आपण सर्वजण मिळून म्हणून काम करावे असे मत लातूर जिल्ह्याचे युवासेनेचे विस्तारक देवेंद्र कांबळे यांनी बैठकी प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी लातूर जिल्ह्याचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, उपजिल्हायुवा अधिकारी, तालुकायुवा अधिकारी, शहर युवाअधिकारी इत्यादी पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments