लातूर :-(प्रतिनिधी)
पेंटिंग आणि वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन लातूरकरासाठी एक मेजवानी असुन प्रत्येकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले.
लातूर जिल्ह्यातील जैवविविधतेच्या विविध घटकांचे वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन आणि विविध प्रकारचे कॅनव्हास पेंटिंग चे प्रदर्शन 22 मार्च ते 27 मार्च दरम्यान लातूरमध्ये भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
एस.टी.वर्कशाॅप समोरील बरुरे काॅम्प्लेक्स मध्ये भरविण्यात आले असुन त्याचे उद्घाटन हे विविध सप्तरंगी फित कापुन पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्यासह माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे , सहा. वन संरक्षक सौ. वृषाली तांबे, पोलीस उप अधीक्षक जितेंद्र जगदाळे, आर्किटेक्ट रणजीत चव्हाण, कलाशिक्षक विठ्ठल मंदे , 3D रांगोळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सोमनाथ भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलिस अधीक्षक सोमय मुंडे म्हणाले की, लातूर हे शैक्षणिक हब आहे. लातूर मध्ये गुणवत्ता ही प्रचंड असुन ती फक्त समाजापुढे येत नाही. ती फक्त राजाश्रय न मिळाल्याने दर्जेदार कला दुर्लक्षित रहाते. ती राहु नये म्हणून अशी प्रदर्शने होणे आवश्यक असते. पेंटींग हे खुप मोठे कार्यक्षेत्र असुन या क्षेत्रात लातूर मधील अनेक नामवंत मंडळी आहे.यात विशेष पेंटिंग क्षेत्रात नावाजलेले चित्रकार राम फड यांनी लातूरकरासाठी खूप मोठी संधी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.राम हा खूप मोठा छायाचित्रकार असुन तो लातूर चा आहे याचा मला अभिमान आहे.त्यांने आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या सुंदर अशा अब्स्ट्रॅक्ट, 3D, कंपोजिशन, निसर्गचित्रे , फिगेरेटिव्ह, इत्यादी पेंटिंग सह स्त्रीभ्रूण हत्या संदेश देणाऱ्या पेंटिंग या प्रदर्शनात लावण्यात आल्या आहेत. तसेच हौशी वन्यजीव छायाचित्रकार पोलीस हवालदार धनंजय गुट्टे यांनी लातूर व सभोवतालच्या परिसरातील जैवविविधता आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून या प्रदर्शनात प्रेक्षकांसमोर मांडली आहे. विविध प्राणी, पक्षी, फुलं , फुलपाखरे, ऐतिहासिक ठिकाणे, साप, चंद्र, तलाव यांचे फोटो या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहेत. असेही ते म्हणाले.यावेळी माझी महापौर विक्रांत गोजमगुंडे, सोमनाथ भोगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदाळे,व छायाचित्रकार राम फड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वन्यजीव प्रेमी धनंजय गुट्टे यांनी केले तर सुत्रसंचलन संवादतज्ञ-उध्दवबापु फड यांनी केले. हे प्रदर्शन लातूर येथील पेंटिंग वर्ल्ड आर्ट गॅलरी, बरुरे कॉम्प्लेक्स अंबाजोगाई रोड येथे दी. 22 ते 27 मार्च 2023 दरम्यान सर्वांना पाहण्यासाठी मोफत खुले राहणार आहे.याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन ही पेंटींग वर्ल्ड च्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments