Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

40 टक्के पेक्षा जास्त प्रमाणपत्र धारक दिव्यांगाना कृत्रिम अवयव मोफत वाटपासाठी नोंदणी शिबिराचे आयोजन – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

40 टक्के पेक्षा जास्त प्रमाणपत्र धारक दिव्यांगाना कृत्रिम अवयव मोफत वाटपासाठी नोंदणी शिबिराचे आयोजन – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर 

औसा व निलंगा तालुक्यातील दिव्यांग बंधु व भगिनीसाठी एडीआयपी (ADIP) योजनेंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधने मोफत वाटपासाठी पुर्वतपासणी व नोंदणी शिबिर दि. 17/04/2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे. याकरीता श्री. रामचंद्र युवक कल्याण संस्था, मोजरी व सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली व जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने 40 टक्के व त्यापेक्षा वरील दिव्यांग बांधवांना सहाय्यभुत साधने देण्यात येणार आहेत. या शिबिरात दिव्यांग बांधवांची मोफत तपासणी करुन ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे तसेच नोंदणीनंतर सहाय्यभुत साधनांचे वाटप करण्यात येणार असून त्याकरीता दिव्यांग प्रमाणपत्र आधारकार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला तहसिल/तलाठी/नगरसेवक यापैकी एक, दोन पासपोर्ट साईझ फोटो आवश्यक आहेत. याचबरोबर दिव्यांग बांधव हा 40 टक्के किंवा त्यापेक्षा वरील असावा व त्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजारापेक्षा कमी असावे. 
औसा व निलंगा तालुक्यातील दिव्यांग बांधवाचे शिबिर दि. 17/04/2023 रोजी नगरपरिषद सांस्कृतिक सभागृह, औसा आणि पंचायत समिती पार्किंग, निलंगा येथे होणार आहे. या शिबिराचा फक्त 40 टक्केपेक्षा जास्त प्रमाणपत्र धारक दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे.
कृपया वरील बातमी आपल्या दैनिकांतून प्रकाशित करावी, ही नम्र विनंती.

Post a Comment

0 Comments