*युवासेनेच्या वतीने निलंग्यात चंद्रकांत पाटलाचा निषेध*
निलंगा: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व हजारो शिवसैनिकांनी बाबरी मज्जिद पडली असताना सुद्धा भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचा यात सहभाग नव्हता असे बेतालवक्तव्य केल्याबद्दल निलंगा युवासेनेच्या वतीने चंद्रकांत पाटलाच्या प्रतीमेस तेल लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
1993 मध्ये शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडल्यानंतर तशी जबाबदारी घेण्यास कोणीच पुढे यायला तयार नव्हता त्यावेळेस हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशिद ही शिवसेनेकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे असे वक्तव्य केले व ती सर्वस्वी जबाबदारी स्वतःवर घेतले हे सर्व हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीला माहीत असताना सुद्धा भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचा त्यात समावेश नव्हता असे बेताल वक्तव्य केल्याबद्दल निलंगा युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे चंद्रकांत पाटलाच्या प्रतिमेस खोबरेल तेल लावून निषेध व्यक्त केला. निषेध व्यक्त करताना युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश दादा जावळे, जिल्हा समन्वयक दत्ता मोहोळकर, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे उपतालुकाप्रमुख मुस्तफा शेख, माधव नाईकवाडे, व्यापारी आघाडीचे प्रसाद मठपती, किसन मोरे, शिवसेनेचे महिला तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, शहरप्रमुख दैवता सगर इत्यादी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments