*महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा*
मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
औराद शहाजानी (प्रतिनिधी) :
शारदोपासक शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र विद्यालय प्राथमिक शाळा,औराद शहाजानी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेबूब लष्करे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे पूजन करून ध्वज फडकवण्यात आला.
१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी जवळपास १०६ जणांनी बलिदान दिले या हुतात्म्यांचे स्मरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बालाजी मरळे यांनी केले. याप्रसंगी चंद्रकांत वलांडे, रमेश थेटे, ज्ञानेश्वर थेटे, संजय कुलकर्णी, संदीप मिरगुडे, अल्ताफ पठाण, अभिषेक बेळंबे, जगदेवी स्वामी, हेमा मोरे, शोभा बिराजदार, मंगल डोईजोडे तसेच पालक प्रतिनिधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments