*समाजातील शोषितांच्या मुक्तीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानार्जन केले* - डॉ.सुरेश वाघमारे
लातूर :-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे डिग्र्यांचे अलेक्झांडर होते पण त्यांनी नोकरीसाठी किंवा उच्चपदासाठी शिक्षण घेतले नाही तर आपल्या अभ्यासातून समाजातील शोषितांच्या मुक्तीचा मार्ग मिळेल या भूमिकेतून त्यांनी ज्ञानार्जन केले असे प्रतिपादन डॉ.सुरेश वाघमारे यांनी केले.
डॉ.आंबेडकर मेडिकोज असोसिएशन एम.आय.एम.एस.आर.मेडिकल कॉलेज, लातूरच्यावतीने आयोजित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोप कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.मिलिंद दवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय महाविद्यालयाचे माजी डीन तथा अकॅडमी डायरेक्टर डॉ.चंद्रकांत शिरोळे हे होते.
पुढे बोलताना डॉ.वाघमारे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाश्चीमात्य देशात शिक्षणासाठी जाण्याअगोदर सयाजीराव गायकवाड यांना ते भेटले होते. महाराजांनी आपण तेथे कोणत्या विषयाचा व त्याच विषयाचा अभ्यास का करणार आहात? असा प्रश्न केला. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, या विषयाचा अभ्यासातूनच मला भारतातील समाजाच्या प्रश्नांची उत्तरे सापडतील व त्यांच्या मुक्तीचा मार्गही सापडेल असे वाटते यावरून त्यांचे शिक्षण घेण्यामागील भूमिका लक्षात येते. या भूमिकेतून त्यांनी शिक्षण घेत राहिले व डिग्र्या त्यांच्या मागे आपोआप आल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळच्या सत्रामध्ये डॉ.चंद्रकांत शिरोळे यांनी केले व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपआपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.लांडगे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.अमिताभ धनवे, डॉ.प्रतीक्षा रामटेके आणि डॉ.संघमित्रा नवले यांनी केले व डॉ.विजय वाघमारे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.लांडगे, डॉ.श्रुती बलखंडे, डॉ.प्रांजली बोराडे, डॉ.गायत्री, डॉ.ब्रह्मानंद हनमंते, डॉ.धनवे आणि डॉ.प्रतीक्षा रामटेके यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments