मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
लातूर :-
संपूर्ण विश्वाला प्रेम, शांती, मानवता आणि करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त लातूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील सामूहिक महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रमाला लातूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम संयोजन समितीतर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समिती तर्फे भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व धम्म ध्वज गाथा घेण्यात आली. त्यानंतर तथागत भगवान बुद्धांना पुष्पाने, धूपाने आणि दीपाने पूजनीय भिक्खू संघातर्फे अभिवादन करण्यात आले. सामूहिक त्रिरत्न वंदने नंतर २२ प्रतिज्ञा आणि संविधान प्रास्ताविका यांचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी भंते इंदवंस आणि भंते बुध्दशील यांची प्रमुख उपस्थिती होती.
भिक्खू पय्यानंद थेरो धम्मदेसना देताना म्हणाले की, शांतीचे अग्रदूत महाकारुणिक विश्व वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला इसवी पूर्व ५६३ मध्ये झाला. शील, सदाचार, करुणा, मैत्री आणि शांततेची शिकवण हे भगवान बुध्दाचे व्यावहारिक व आध्यात्मिक तत्त्वज्ञान असून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व सामाजिक न्याय हा तथागत बुद्धांचा समग्र जगाला वैश्विक संदेश आहे. भगवान बुद्ध संपूर्ण आशिया खंडाचे दीपस्तंभ (लाईट आॕफ एशिया) व मार्गदर्शक ठरले आहेत. समाजाला बुद्धीप्रामान्यवादी, विज्ञानवादी आणि सुसंस्कारी बनवणे हे बुद्ध शिकवणुकीचे ध्येय आहे. अशा या भारताच्या महत्तम युग प्रवर्तक महामानव ठरलेल्या तथागत भगवान बुद्धांची जयंती जगभरात मोठ्या स्वरूपात साजरी होताना लातूर शहरांत ही महाबुद्ध वंदना कार्यक्रमाद्वारे तथागत बुद्ध यांना अभिवादनाला मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित झालात ही खूप आनंदाची बाब आहे. महा बुद्ध वंदना ही सामाजिक व धार्मिक एकीकरणाचा संदेश देणारी असून समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेची साक्ष देते, महाबुद्ध वंदना ही येणाऱ्या काळात लातूर येथील बौद्ध समाजाची ओळख निर्माण करत आहे, तेव्हा समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात एकीकरण करून समाजाचा सर्वांगीण विकास करावा असेही भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले.
या महा बुद्ध वंदना कार्यक्रमात पावसाचा व्यत्यय आणि मैदानामध्ये पाणी साचलेले असताना ही हजारोच्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका, लहान बालके व वृद्ध उपासक यांनी उभे टाकून अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.देवदत्त सावंत यांनी केले तर आभार मिलिंद धावारे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी मल्लिकार्जुन करडखेलकर, प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे, केशव कांबळे, संजय सोनकांबळे, ज्योतीराम लामतुरे, पांडुरंग अंबुलगेकर, प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे, डॉ.संजय गवई, प्रा.सतीश कांबळे, विनोद कोल्हे, निलेश बनसोडे, उदय सोनवणे, कुणाल शृंगारे, अनिरुद्ध बनसोडे, डॉ.अरुण कांबळे, अविनाश आदमाने, गौतम आदमाने, विनय जाकते, राज धायगुडे, डॉ.सुमेध कांबळे, भरत कांबळे, नवनाथ आल्टे, लाला सुरवसे,वसंत वाघमारे, साधु गायकवाड, विनोद खटके,विजय अवचारे,संजय ओव्हाळ, सुधाकर कांबळे, सुमन उडानशिव, सरिता बनसोडे, शकुंतला नेत्रगावकर, सुजाता आजनिकर, शोभा सोनकांबळे, निर्मला गौरकर, लता चिकटे, अर्चना आल्टे, आशा चिकटे व समस्त समाज बंधू भगिनी आणि संयोजन समितीतील सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments