Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*लातुर - जहीराबाद महामार्गावर बनलेल्या जिवघेण्या खड्डयासाठी गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात*


*लातुर - जहीराबाद महामार्गावर बनलेल्या जिवघेण्या खड्डयासाठी गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात*

दोन वर्षांपासून रखडले आहे पुलाचे बांधकाम ..

मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
                   9890098685

औराद शहाजनी:-

         लातूर-जहीराबाद जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२(के) या रस्त्याचे काम औराद शहाजानी येथे जवळपास दोन वर्षांपासून पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबल्यामुळे आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे महाराष्ट्र विद्यालय शाळेच्या बाजुला अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलाच्या कामाचे खोदकाम करुन खड्डा तयार करुन ठेवला आणि त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने अनेक अपघात झालेले आहेत तसेच मागच्या महिन्यात तर चक्क पहाटे परजिल्ह्यातील एक चार चाकी गाडी (कार) खड्डयात पडली होती व सुदैवाने चालक सावध असल्याने जीवितहानी टळली होती. त्यामुळे वारंवार मागणी होऊनही सदरचे जिवघेण्या धोकादायक पुलाचे काम तातडीने सुरु करावे यासाठी गावकरी रास्तारोको आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले आहेत.
         याची सविस्तर माहिती अशी की, जवळपास दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलाचे काम खोदकाम करुन ठेवल्यामुळे या लातूर-जहीराबाद जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२(के) या रस्त्यावरील खड्डयात घाण पाणी साचुन दुर्गंधी तर पसरलेली आहे शिवाय या धोकादायक खड्डयात अनेकवेळा दोनचाकी वाहन व इतर वाहन सुध्दा पडले होते पण या रस्त्याचे काम करणारे शिंदे डेवलपर्स असलेले कंत्राटदार व एम एस आर डीसी चे प्रशासकीय अधिकारी सुध्दा न्यायालयात काम करण्यासाठी परवानगी देऊनही करत नसल्याने या रस्त्यावर मोठे भगदाड पडल्यामुळे अनेकवेळा जीवघेणे अपघात तर होत आहेत शिवाय अनेक वाहनांचे चेंबर फुटुन नुकसान झालेली आहे. तसेच लोकांचे जिव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
       या धोकादायक खड्डयात यापूर्वी सुध्दा असे अपघात झाले आहेत व सध्याही घडत आहेत त्यामुळे एकतर प्रशासन व कंत्राटदार यांनी तात्काळ हा खड्डा बुजवावे किंवा पुलाचे काम तरी लवकर पुर्ण करुन घ्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी आता चक्क रास्तारोको पुकारले असुन आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकांनी स्वतः होऊन सह्या करत येत्या सोमवारी ८ मे पर्यंत तात्काळ कामाला सुरुवात करावी अन्यथा ८ मे रोजी सकाळी १० वाजता हा जिवघेणा रस्ता अडवुन बंद करत रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी लातूर, उपविभागीय अधिकारी निलंगा , तहसीलदार निलंगा व पोलीस प्रशासन औराद यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments