*श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.*
सोमवंशी नागनाथ गुरुजी यांनी घेतला योगा वर्ग.
उदगीर प्रतिनिधी.
उदगीर शहर हे उद्धलिक बाबाच्या पवित्र पावन भूमीत अनेक असलेले हे उपजिल्हा असलेले शहर असून या शहरात अनेक नामांकित प्राथमिक, माध्यमिक ,उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये आहेत. शाळा आहेत उदगीर शहरातील त्यापैकीच एक नामांकित असलेली श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयाची स्थापना सन 1991 स्थापन झाली असून शाळा स्थापनेपासून आज तागायत शाळेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक, सामाजिक, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आरोग्य शिक्षण याला महत्त्व देऊन. या शाळेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये एक आगळावेगळा आपला ठसा निर्माण केला आहे. आज तगायत या विद्यालयातून अनेक नामवंत विद्यार्थी आपल्या विविध क्षेत्रात देशभर कार्यरत आहेत.
आंतरराष्ट्रीय योगाचे औचित्य साधून आज विद्यालयात विद्यार्थी प्रिय असलेले क्रीडाशिक्षक नागनाथ सोमवंशी गुरुजी यांनी अतिशय सुंदर असा योग वर्ग त्यांनी घेऊन विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले. या योगामुळे होणारे फायदे याचीही महत्त्व त्यांनी पटवून दिले.
या आंतरराष्ट्रीय योग दिन प्रसंगी विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक राजाराम भोसले यांनी सोमवंशी गुरुजी यांनी घेतलेल्या योगा वर्गाचे कौतुक व अभिनंदन करून शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यासाठी विद्यालयातील कर्मचारी दीपक आलट, शिवाजी दाडगे, महेश जगळपुरे, श्रीमतीसुनीता तेलंग, श्रीमती मीना गायकवाड , श्रीमती उषाताई बोळेगावे, श्रीमती अनुसया मोरे, भरत नवटके, माधव घुळे,भागवत ढगे, यशवंत वाघमारे, भागवत ढगे ,प्रकाश भंडारे , गौसोदिदन तांबोळी ,बालाजी सुवर्णकार, सुदर्शन शिशुविहारच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती गोदावरी रक्षाळे, श्रीमती नेत्र गावकर मॅडम शिक्षकेतर कर्मचारी सुनील बिरादार, काशीबाई बिरादार यांची उपस्थिती होती.
यावेळी सोमवंशी गुरुजी यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या योगाचे भरभरून कौतुक करून त्यांच्या निरोगीमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास सुदर्शन विहार उदगीर येथील विद्यार्थी व श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या योग वर्गाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष देविदासराव औटे, सचिव प्रा. बाबुराव नवटके ,शालेय समितीचे सदस्य ऋषिकेश जाधव, कांतराव रोडगे, व मंडळाचे इतर सर्व पदाधिकारी व सन्माननीय सदस्यांनी शाळेतील विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक व.सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments