सोनार (सुवर्णकार) समाजाचे मुखपत्र असलेले महाराष्ट्रातील अग्रगण्य साप्ताहिक जय नरहरी च्या उपसंपादक पदी बालाजी सुवर्णकार यांची निवड.
उदगीर:-
महाराष्ट्र ही संतांची भूमी या संतांच्या भूमीत असलेले संत जनाबाई यांची जन्मभूमी असलेले परभणी हे जिल्ह्याचे ठिकाण आणि महाराष्ट्रातील सुवर्णकार सोनार समाजाची अग्रगण्य असलेले जय नरहरी साप्ताहिकाचे मुख्य संपादक , शरद कुलथे यांनी बालाजी सुवर्णकार यांच्या शैक्षणिक ,सामाजिक, धार्मिक ,आणि पत्रकारितेतील अनुभवाच्या कार्याची दखल घेऊन जय नरहरीच्या उपसंपादक पदी निवड केली आहे. मुख्य संपादक शरदजी कुलथे यांनी बालाजी सुवर्णकार यांची जय नरहरीच्या उपसंपादक पदीनिवड केल्याबद्दल बालाजी सुवर्णकार यांना जय नरहरीच्या साप्ताहिकातून कार्य करण्याची खूप मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बालाजी सुवर्णकार यांनी मुख्य संपादक शरद कुलथे आभार यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहे.
सोनार (सुवर्णकार) समाजाचे महाराष्ट्रातील एकमेव अग्रगण्य असलेले जय नरहरी साप्ताहिक च्या उपसंपादक पदी बालाजी सुवर्णकार यांच्या निवडी बद्दल ऑल इंडिया सोनार फेडरेशन चे मुख्य संस्थापक अध्यक्ष मोहनशेठ हिवरकर, दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप महतकर (अमरावती), विश्वकर्मा संस्थान शिरपूर येथील नूतन अध्यक्ष रामदासजी काटकर, दैवज्ञ सेवाभावी संस्था नांदेड चे अध्यक्ष दीपक बोधने , दैवज्ञ सोनार एकता संघाचे पदाधिकारी नामदेव सुवर्णकार मधुकर टोम्पे, आंबेजोगाई येथील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार, श्री दैवज्ञ सुवर्णकार सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित एक विचार एक मंचचे सर्व पदाधिकारी, दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी सदस्य तथा नांदेड येथील सुवर्णकार (सोनार) समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तथा आदर्श उपप्राचार्य राजीवजी आंबेकर, विविज्ञ माधुरीताई रत्नपारखी, अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पुष्पाताई सोनार, पदाधिकारी रामचंद्र कपिले, श्री संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर जिल्हा लातूरचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक मंडळ पदाधिकारी, ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार घुले, विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्याचे राज्यप्रमुख सुदर्शन बोराडे, ओबीसी हक्क परिषद दिल्ली शाखा लातूरचे अध्यक्ष तथा सोनार (सुवर्णकार) समाजाचे निलंगा लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पोद्दार, ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबाराव दुपारे, राष्ट्रीय सचिव तथा सी न्यूजचे संपादक जाफरखान शेख साहेब, राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख तथा आदर्श शिक्षक सुभाष तगाळे, दैनिक राजधर्म लातूरचे ज्येष्ठ पत्रकार अंबादास आलमखाने, बारा बलुतेदार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव दापकेकर ,सदस्य प्रा. शशिकांत जाधव, आदर्श शिक्षक संजय पांचाळ, व्ही. एन. के. (व्यंकटेश) नगरचे अध्यक्ष विजय राठोड, उपाध्यक्ष अरविंद धानुरे सर, सचिव सुधाकरराव मोहिते यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी व सन्माननीय सदस्य, फलटण येथील सोनार सुवर्णकार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते बबन पोतदार, बालाजी सुवर्णकार यांच्या 1988 एस.एस.सी .बॅचचे उत्तीर्ण वर्गमित्र नारायण माने,( इंजिनीयर पुणे) बालाजी पांचाळ, ( शिक्षक मुंबई) बालाजी बिरादार, (शिक्षक हातराळ जिल्हा नांदेड) सतीश पाटील, (कला शिक्षक जय हिंद सीबीसी स्कूल उदगीर ) अशोक जोशी (सी.ए. पुणे) सरूबाई बिरादार (पुणे)वर्षा पाटील ,सुजाता मुळे, मीना कुंभार ,मीरा पांडे, यांच्यासह महाराष्ट्रातील सोनार सुवर्णकार समाजाच्या विविध संघटनेच्या सर्व पदाधिकारी सन्माननीय सदस्य तसेच शैक्षणिक सामाजिक राजकीय धार्मिक कला साहित्य क्रीडा मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्वल लेखणीच्या कार्यातून उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments