*श्री सिद्धेश्वर मंदिरात अंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.*
लातूर:-
श्री सिद्धेश्वर व्यायाम संघ,सक्षम फाऊंडेशन, विर योद्धा संघटना आणि आर्यविर दल यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरामध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराची सुरुवात ही गायत्री मंत्राने करण्यात आली. त्यानंतर योगा घेण्यात आला त्यामध्ये वेगवेगळ्याप्रकारचे योगासने, शाररिक व्यायाम, मानसिक संतुलनासाठी विविध व्यायाम तसेच विविध मंत्रउच्चारणे घेण्यात आली. या शिबिरास योग शिक्षक म्हणून सागरजी सूर्यवंशी तसेच मान्यवर म्हणून चंद्रकांतजी चिकटे, पांडुरंगजी क्षीरसागर, गोविंदजी जगताप आणि सुभाषजी गोरे हे लाभले व त्यांनी योगासनाबद्दलचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरास महिलांची लक्षणीय उपस्थिती होती, तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या शेवटी महाप्रसाद म्हणून खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले.
तसेच मंदिरामध्ये रोजच सकाळी ६ ते ७ योगा आणि व्यायाम घेतला जाणार आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद व लाभ घ्यावा. असे आव्हान श्री सिद्धेश्वर व्यायाम संघातर्फे करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी श्री सिद्धेश्वर मंदिरातील हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर कमिटीचे विशेष आभार, तसेच हे शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी व्यायाम संघातील सर्वच तरुणांचे विशेष सहकार्य लाभले.
हे शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रत्येक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे संभाजी कांबळे यांनी आभार मानले.

Post a Comment
0 Comments