Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*“युवकांनी सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी व्हावे”भदंत पय्यानंद स्थवीर*

“युवकांनी सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी व्हावे”
भदंत पय्यानंद स्थवीर 

लातूर:-

आजच्या युवकांनी शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपल्या स्व कर्तुत्वाने यश संपादन करून समाज विकासप्रक्रियेत सर्वोतोपरी सक्रिय सहभागी व्हावे असे प्रतिपादन भदंत पय्यानंद स्थवीर यांनी केले.
“दर रविवार चलो बुद्ध विहार अभियान” अंतर्गत ग्रामीण परिसरातील पाखरसांगवी येथे  सामूहिक बुद्ध वंदना कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना घेण्यात आली. 
पुढे धम्मदेसना देताना भदंत पय्यानंद स्थवीर म्हणाले की, तरुण पिढीने समाजातील प्रत्येक क्षेत्रात तन-मन-धनाने योगदान द्यावे. आधुनिक काळात शिक्षण, वैचारिक प्रगल्भता, दूरदृष्टी, मेहनत, जिद्द व चिकाटी या सारख्या गुणांच्या आधारे सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी युवा पिढीने तत्परतेने समाजकार्य व स्व: समाज जागृतीसाठी एक पाऊल पुढे टाकून समाजाचा विकास करावा अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. 
यावेळी प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे, निर्मला थोटे, बाबासाहेब कांबळे, सरपंच बालाजी कांबळे यांनी मनोगते केली. तसेच २२ प्रतिज्ञा व भारतीय संविधान प्रास्तविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आला. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिरुद्ध बनसोडे, उदय सोनवणे, ज्योतीराम लामतुरे, डॉ. अरुण कांबळे, प्रा.सतीश कांबळे, पांडुरंग अंबुलगेकर, डॉ.संजय गवई, ऋषिकेश ढगे, सुमित कांबळे, रोहित वाघमारे, रणजित सरवदे, ऋषिकेश वाघमारे, नेहरू कांबळे, अमित कांबळे, रवी सरवदे, शुभम चव्हाण, ओम कांबळे, उज्वल कांबळे, सुशांत कांबळे, माणिकराव कांबळे, गंगासागर ढगे, आम्रपाली कांबळे, नागरबाई कांबळे, मंगलबाई कांबळे, सुमित्रा सरवदे, रूपाबाई ढगे, सरिता बनसोडे, सुमन उडानशिव, शकुंतला नेत्रगावकर, शामल कांबळे, पंचशीला बनसोडे आदिनी परिश्रम घेतले. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्तेश्वर थोटे यांनी केले तर आभार मिलिंद धावारे यांनी मानले. यावेळी पाखरसांगवी गावातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments